Amhi Putra Amrutache (Marathi)


Amhi Putra Amrutache

आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे
उजळून आज दावू भवितव्य मातृभूचे ॥धृ॥

पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे
नाही निशाण त्यांचे उरले जगात कोठे
गेली सहस्त्र वर्षे लढलो न थांबताही
गझनी सिकंदराची उरली न मृत्तिकाही
आम्ही काळपुत्र आम्हा ये ईल मरण कैसे ॥१॥

हे राष्ट्र संकटंशी लढले अनेक वेळा
कोणी न जिंकले हे भासे अजेय काळा
आदर्श जीवनाचा हा वृक्ष अमर याला
जरी तोडिले बळाने तरी स्पर्शितो नभाला
त्याचेच पुत्र आम्ही जयवंत जे सदाचे ॥२॥

जरी काळकूट प्यालो तरी नाही मृत्यु आला
अग्नीत पद्मीनीचा जळतो कधी न आत्मा
दाहीर कन्यकांचे जरि देह आज नुरले
आत्मे तरी तयांचे अतीदिव्यरूप झाले
ते प्राण आमुचे अन् आम्ही प्राण या जगाचे ॥३॥

ही चिन्मयी भरतभू जगतास ज्ञान देता
ही देव जन्मभूमी धर्मास ग्लानी येता
ही मूर्त अन्नपूर्णा जगतास पाळताना
जी काली रूप घेते दुष्टास शासताना
या मा ऊलीस अर्पू गुरुस्थान या जगाचे ॥४॥

Amhi Putra Amrutache (Marathi)
Amhi Putra Amrutache (Marathi)

Post a Comment

0 Comments