Sangh Maza Changala (Marathi)
संघ माझा चांगला
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संघ माझा चांगला गाव समदा रंगला
चंग आम्ही बांधला भेदभाव संपला ॥ध्रु॥
मोकळ्या या मैदानावर वारा वाहे झूळझूळ
पावलांच्या तालावर लेझिम वाजे खूळखूळ
खराखुरा खेळ खेळू शत्रु करु खिळखिळा ॥१॥
आट्यापाट्या हुतुतुच्या आखल्या या पाट्या
उठाबशा जोर काढून फिरवू या लाठ्या
जुलूमाला खो देऊन संघ वाढू लागला ॥२॥
उडीसंगं चकाकतं जंबियाचं पातं
तलवारीचे वार कसे निघती तोलात
सरसावुनी भिडवितो रोखलेला भाला ॥३॥
गावकरी कामधंदे हातचे सोडून
शाखेवर धाव घेती बोलणी ऐकून
संघगाणी गावयाचा छंद त्यांना लागला ॥४॥
हिंदुस्थान हिंदूंचा भगवा झेंडा त्यांचा
म्होरक्याचं ऐकायाच संघ सेवकांचा
बघा बघा गाव सारा आला प्रार्थनेला ॥५॥
Sangh Maza Changala (Marathi) |
0 Comments